निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी, कुत्र्यांची छत्री, मशरूम अशा अनेक नावाने आपण ओळखतो. जगात १४.००० ते २२.००० मशरूम असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कितीतरी अनाभिज्ञ आहेत. खरंतर कवक वनस्पती नाही कवकांचे स्वतःचे साम्राज्य असते. अनेक गूढ असणारी ही गुणवान कवक आश्चर्यकारकरीत्या पावसाळ्यातच उगवणारी जणू काही या भूमीवर छोट्या-छोट्या सूक्ष्मजीवांना आधार देण्यासाठी छत्रीच्या रूपांमध्ये अवतरलेली ही कवक म्हणजेच भूछत्र. या भूछत्रांच्या अनेक प्रजाती आहेत. बऱ्याच नामशेष झाल्या असतील, बऱ्याच अजून माहीत नसलेल्या, निनावी आणि अजूनही गुप्त रूपात असलेल्या आहेत. फुलांसारखीच जमिनीची सुंदरता वाढवणारे म्हणजेच हे मशरूम. १८५८ मध्ये हेनरिक ॲटॉन डी बॅरी यांना बुरशीचा प्रथम
शोध लागला.
हिरव्यागार जंगलामध्ये यांचे रूपच काही वेगळेच दिसते जी सुकलेल्या ओल्या पालापाचोळ्यात उगवते. काही कवक दुसऱ्या झाडांवर उगवतात जे परजीवी असतात आणि मुळाशी असणारे त्यांचे सहजीवी कवक. झाडांसाठी हे खनिज एकत्र करतात आणि त्या जागी वृक्ष त्यांना शर्करा देतात, त्यांचे पोषण करतात. पावसाळ्याच्या दरम्यान जंगलामध्ये ही कवक भरपूर उगवतात. ही कवक पावसाळ्यातच का उगवतात? पावसाचे पाणी, जमिनीतील माती आणि झाडांची सुकलेली पानं त्यांच्यामुळे जी खनिजं निर्मिती होते. ती या मशरूमसाठी पूरक असते. मृत वनस्पतींमधील कार्बन आणि खनिजांचा वापर करून स्वतःचे हे पोषण करतात. हरितद्रव्य नसलेली, परपोषी पटलं, आच्छादित केंद्रक, तंतुकणिकांसारखी अंगी लवके असणारी, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया नसणारे एकपेशीय किंवा बहुपेशीय अशी कवके असतात. कवकांचे तंतू कठीणपेशी भित्तीचे असून त्यात कायटिन, सेल्युलोज आणि बहु शर्करायुक्त पदार्थ असतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया नसल्यामुळे अन्नासाठी कार्बनी पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. ही कवके माती, वनस्पती, प्राणी आणि मृत पदार्थात आढळून येतात. रोगजनक कवकांमुळे वनस्पतींना आजार होतात. जगभरांमध्ये १९ हजारपेक्षा जास्त बुरशीयुक्त आजार वनस्पतींना होतात.
रानभाजी आळंब्याचा समावेश आपल्या आहारात केल्यास आपल्याला तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जंगलातील पांढरे साधे मशरूम उगवताना छत्रीसारखे उगवतात. जसजसे मोठे व्हायला लागतात तशा त्या छत्र्या फुलतात आणि मग फुलांसारखे त्यांना कट येतात ते फुलण्याचा आधी जेव्हा कळ्यासारखे असतात तेव्हा त्यांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. जवळजवळ पाच मिलियन प्रकारचे फंगल्स जंगलामध्ये आढळतात. काही जेली स्फटिकांसारखे, कधी चिकट द्राव सोडणारे, पक्ष्यांच्या अंडी असलेल्या घरट्यांसारखे, कधी विखुरलेले तर कधी एकत्रित, कधी छत्रीसारखे तर कधी उलट्या छत्रांसारखे, शंकू, गोल, नागमोडी, वाऱ्यांबरोबर पर्या सारखे नाचणारे, डोलणारे, पालापाचोळ्यांतून डोकावून हळूच चिडवणारे, रंगीबेरंगी, आकर्षक, मोहक स्वतःच्याच विश्वात रमलेले, कधी झाडांवर चढणारे तर कधी जमिनीवर स्वतःच साम्राज्य उभारलेले, एखाद्या जादुई नगरीसारखे, कधी सूक्ष्मजीवांना जीवदान देणारे तर कधी त्यांच्यासाठी घातक असणारे, गुबगुबीत, मांसल, आकर्षक, रंगीबेरंगी. शरीर रचना कधी सूक्ष्म तर कधी अवाढव्य, काही पौष्टिक तर काही विषारी, कधी भुईमुगाच्या शेंगासारखे तर कधी मेंदूच्या रचनेसारखे, पारदर्शक, तर कधी अपारदर्शक, तर कधी रात्री चमकणारे अशा अनेक गुणांनी युक्त अशी ही कवक. प्रत्येक भूछत्र हे त्याला मिळणाऱ्या वातावरण पूरकतेनुसार असते. त्यांचा रंग, त्यांची नक्षी त्यांचं पोत हे सर्व त्यावरच अवलंबून असते. काही उलट्या छत्रीसारखे ठिपक्यांचे विविध रंगी फुलांसारखे वाळल्यानंतर सुद्धा अगदी आकर्षक नक्षीचे दिसायला लागतात. त्यांची लक्षयुक्त रचना असते. यांच्यात असणारे तंतू विविध आकार घेतात. हे कायम ओलसर जागी उगवतात. कधी एकटे दिसतात, तर कधी झुंडीने दिसतात. पर्यावरण परिस्थितीवर यांचे आकारमान रंग आणि उत्पत्ती अवलंबून असते. त्यानुसार ते स्वतःची वाढ आणि दिशा ठरवून घेतात.
जंगलातील मातीचा पुनर्वापर करण्यासाठी सक्रिय करण्यात त्यांचा फार मोठा हातभार आहे. जमिनीखाली असणाऱ्या परजीवींपासून झाडांच्या मुळांचे संरक्षण करतात आणि झाडांद्वारे पोषकद्रव्य शोषण्यास त्यांना मदत करतात. बुरशीना झाडांपासून त्यांना आवश्यक असणारी साखर मिळते. बुरशी सेंद्रिय पदार्थांचे विघटन करते. कवक म्हणजे मांसल, नरम शरीर संरचनेत छत्रीरूपात ओल्या लाकडावर, सुकलेल्या ओल्या पाल्या पाचोळ्यात उगवणारी बुरशीच. यात आढळणारे सेलेनियम आपल्या शरीराला निरोगी ठेवते. विषारी मशरूमवर डाग असतात.
जेव्हा हे मशरूम एखाद्या झाडावर उगवायला लागतात तेव्हा समजायचं की आता या झाडांचे वय झालेले आहेत ते लवकरच मृत होणार आहेत. यापूर्वी मी तुम्हाला झोंबी फंगसबद्दल माहिती दिली होती. ऑस्ट्रेलियामध्ये एक जादुई कवक मिळाले आहे जे मानसिक आजारांवर उपयुक्त आहे. मायसेलियल कवकांचे अगदी सूक्ष्मपासून खूप एकरांमध्ये त्यांचे वास्तव्य असते. ते सुद्धा बऱ्याच वर्षांपर्यंत. कप ट्रॅफल शंकूसारखा आकार असतो. भारतात सहा प्रकारचे मशरूम आहेत. बटन, ऑयस्टर, रेशीम मधू, शिताकी, अनोकी, मोरेल मधू. भारतात “व्हाईट बटन मशरूम” हे खूप प्रसिद्ध आहे. भारत उष्ण कटिबंधीय देश असला तरी आर्द्रता असलेला आहे त्यामुळे कवकांसाठी स्वर्गयुक्तच आहे. भारतामध्ये बटन कवकांची शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे टोपीच्या आकाराचे असून लहान पांढऱ्या रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे असतात. याचा हलका स्वाद असल्यामुळे पिझ्झा, सॅलड अशा व्यंजनामध्ये उपयोग केला जातो. यांत फायबर, अंटीऑक्सीडंटचे समृद्ध प्रमाण आणि प्रथिनयुक्त असे आहे. हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, अल्झायमर यांसारख्या रोगावर उपायकारक आहे. डेथ कैप मशरूम हे ओक, हेजल, शाहबलकूत या वृक्षांवर उगवतात. हे परजीवी, मृतोपजीवी असून पर्णविरहित, कोशिका एककेंद्रीय, द्विकेंद्रीय, बहु केंद्रीय असतात. याचे भित्तिकवक सेलुलोसचे बनलेले असते. ज्यांच्यात लैंगिक जनन नसते त्यांना अपूर्ण कवक म्हणतात.
काही कवकामुळे गंभीर संक्रमण सुद्धा होऊ शकते. जसे मलेरिया, टूबरकोलेसिस, कैंडिडीयासीस, एडस. क्लब कवकाच्या खाली छोटे डेंठल निर्माण होतात. त्याच्या बाहेरच्या बाजूस चार बिजाणू असतात त्याला “बेसिडियोस्पोर्स” म्हणतात. आपण हे खाऊ शकतो. जंग आणि स्मार्ट हे धान्यावर उगवणारे परजीवी कवक आहेत. पोर कवक त्यात बिजानुयुक्त छिद्र असतात. रीब कवक, लायकेन कवक वालुकामय आणि अंटार्टिका प्रदेशात उगवतात. यांची वाढ अतिशय सावकाश होत असते आणि हे वायुप्रदूषणासाठी अत्यंत संवेदनशील असतात. लहान लहान सॉसेसच्या आकाराच्या रचना लायकेंवर उगवतात. या संरचनेमध्ये साईनो बॅक्टेरिया असतात ज्या वातावरणातील नायट्रोजन व्यवस्थित करतात. ब्राऊन ब्रिच बोलेट, कीटक कुकुरमुत्ता, किंग अल्फ्रेड केक दुर्गंधीयुक्त शिंग, चिनी मातीचे कवक जंगलात मिळणारी ही पाच प्रमुख कवक आहेत म्हणजे आपल्यातला ज्ञात असणारी. पफ बॉल, ब्रॅकेट फंगी, जेली फंगी, बॉलेट्स, अर्थ स्टार, बटंस, रस्टस, मिरर यीस्ट, क्रिप्टोकोकुस अनेक प्रकारच्या बुरशा या गर्द जंगलात आढळतात.
क्रमश:
dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com