DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता?
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे आणि याच रायगड जिल्ह्यात गोवंश हत्येचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढतांना दिसत आहे. त्यातच १८ जून रोजी महाड जवळील इसाने कांबळे येथे होणाऱ्या गोवंश हत्येविषयी गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिली आणि कसायांना गोवंश हत्या करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर कारवाई देखील झाली. मात्र त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात जमलेल्या मुस्लिम समाजातील जमावाने कायदेशीर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर आणि बरोबर असलेल्या हिंदू तरुणांवर लाठ्या, काठ्या घेऊन हल्ला केला आणि विषय एवढ्यावर न थांबता त्यातील चार हिंदू गोरक्षकांना पोलीसांच्या समोर समाजकंटकांनी बेदम मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड येथील DYSP शंकर काळे यांना याबाबत सर्व माहिती होती. तसेच गावातील नागरिकांनी वेळोवेळी DYSP यांना माहिती दिली असून देखील त्यांनी टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच संबंधित आरोपींना देखील त्यांनी पाठीशी घातल्याचे निष्पन्न झाले असून गोरक्षकांना धमक्या देणे, बरेवाईट बोलणे, तुम्हाला तडीपार करेन अशा प्रकारची वागणूक जनसामान्यांस DYSP शंकर काळे यांनी दिल्याचे समोर आले आहे. सदर घटनेत एकूण ५० ते ६० लोकांचा जमाव असताना देखील केवळ त्यांनी १६ आरोपींना अटक केली आहे आणि बाकी आरोपींना अद्याप अटक का केली नाही या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
आमदार नितेश राणे यांनी जेव्हा त्यांची भेट घेतली त्यावेळी डीवायएसपी यांच्या कार्यापासून अवघ्या २०० मीटर वर एक कत्तलखाना आहे तो आपण बघण्यास जाऊ असे सांगितल्यानंतर देखील त्यांनी तो विषय टाळल्याचे सर्वांनीच बघितले त्यामुळे या सर्व गोवंश हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार DYSP काळे आहेत की काय? अशी चर्चा जनसामान्यांत होऊ लागली आहे.
DYSP यांच्या भागातील चालू असलेले अनधिकृत कत्तलखाने पुढीलप्रमाणे –
Dysp office व शहर पोलीस स्टेशन एकाच इमारतीत आहे त्यांच्या २०० मीटर परिसरात – कोट आळी येथे कत्तलखाना
महाड बस स्थानक जवळ : काकरतळे मोहल्ला येथे कत्तलखाना
राजेवाडी गाव येथे कत्तलखाना (या ठिकाणी गोरक्षक व पोलीसांनाही मारहाण )
चांढवे : मोहल्ला येथे कत्तलखाना
इसाने कांबळे (मोहल्ला ) येथे कत्तलखाना (याठिकाणी गोरक्षक व पोलीसांनाही मारहाण )
तेलंगे गाव येथे कत्तलखाना
शिरवली गाव येथे कत्तलखाना
पोलादपूर तालुका
वावे गाव येथे कत्तलखाना
बोरज गावात : गोठ्यात कत्तलखाना
काटेतळी गावाजवळ जंगलात कत्तलखाना.
हा सर्व परिसर DYSP शंकर काळे यांच्या अधिकारात येतो त्यामुळे या कत्तलखान्यांच्या मालकांच्या डोक्यावर DYSP काळे यांचा हात आहे की काय? अशी दबक्या आवाजात गावात चर्चा सुरू झाली आहे. सदर विषय माननीय राज्याचे गृहमंत्री यांच्या पर्यंत पोहोचला असून राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात सदर विषय येण्याची दाट शक्यता असून अधिवेशनात पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होते का हे बघणे महत्त्वाचे ठरेल. DYSP काळे यांच्या आर्थिक मालमत्तेची चौकशी व्हावी असे पत्र लोकप्रतिनिधींना मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे अधिवेशनात नेमके काय होते ते येणारा काळच सांगेल. त्यामुळे आतातरी गाईंना, वासरांना अधिवेशनात लोकप्रतिनिधी न्याय मिळवून देतील का अशी जनसामान्यात चर्चा होत आहे.