Assam Rain : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! पुरामुळे ५२ लोकांनी गमावले प्राण

८ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडील शोधत असताना मुलाची केवळ चप्पल मिळाली


दिसपूर : सध्या देशभरात सगळीकडे पावसाचे वातावरण (Rain updates) आहे. त्यातच ईशान्येकडील राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आसाममध्ये पूर (Assam flood) आला आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुत्रा यांसारख्या राज्यातील प्रमुख नद्या आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने जवळपास २४ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. तर गेल्या आठवड्यापासून पूरसंबंधित अपघातांमुळे आतापर्यंत ५२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


सरकारच्या माहितीनुसार, आसामच्या २९ जिल्ह्यांमध्ये एकूण २३,९६,६४८ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ६८,७६८.५ हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. एकूण ५३,४२९ बाधित लोकांनी ५७७ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. निमतीघाट, तेजपूर, गोलपारा आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. त्याच्या उपनद्याही अनेक ठिकाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.



आठ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडिलांची शोधमोहिम सुरु


दुसरीकडे गुवाहाटी येथील नाल्यात बुडालेल्या आठ वर्षांच्या अभिनाश नावाच्या मुलाचा शोध सुरू आहे. अभिनाश बेपत्ता होऊन तीन दिवस झाले, मात्र अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. अभिनाशचे वडील हिरालाल सरकार हे एकटेच आपल्या मुलाचा शोध घेत आहेत. झडती घेतली असता त्यांच्या मुलाची चप्पल सापडली. हिरालाल म्हणाले, "मी त्याला शोधतोय मला फक्त माझ्या मुलाची चप्पल सापडली आहे. सरकारकडे यंत्रणा आहे, त्यांना माझा मुलगा शोधावा लागेल."



पुराने वन्य प्राण्यांचाही घेतला जीव


आसाममधील प्रसिद्ध काझीरंगा नॅशनल पार्क (KNP) मध्ये आलेल्या विनाशकारी पुराने ११४ वन्य प्राण्यांचा जीव घेतला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. केएनपीमध्ये चार गेंडे आणि ९४ हॉग डीअरचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या इतर ११ जनावरांचाही यात समावेश आहे.



कोणत्या जिल्ह्यांना पुराचा फटका?


आसाममधील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये गोलपारा, नागाव, नलबारी, कामरूप, मोरीगाव, दिब्रुगढ, सोनितपूर, लखीमपूर, दक्षिण सलमारा, धुबरी, जोरहाट, चरैदेव, होजई, करीमगंज, शिवसागर, बोंगईगाव, बारपेटा, धेमाजी, हैलाकांडी, बिरहाटवा, गोलाकांडी या जिल्ह्यांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत