काव्यरंग : पाऊस मायेची शिंपण

धरणीची होता लाही, तू शिंपतो मायेचे पाणी
चिंब चिंब भिजताना, मुले गातात तुझी गाणी


हिख्या हिरव्या शेताने, पाखरांना फुटते वाणी
तू रिमझिम बरसताना, डोलतात झाडे अवनी


श्रावणात सण बहरता, शृंगारात सजते सजणी
मेघातून येता जलधारा, पापणीतले संपते पाणी


तू सरसरत येताना, करतोस आनंदाची पेरणी
तू यावे असेच भेटाया, जीवलगा तू या जीवनी



- स्वाती गावडे, ठाणे

पहिला पाऊस


बदाबदा किती...
कोसळतोय तू...
भिजवित सुटला चिंबचिंब
सारा आसमंत तू...!!

सृष्टी भिजली सारी...
हरित तृनही शहारले...
डोंगर दर्यातूनही पाहा
झरे नाले प्रसवले...!!


हिरव्या रानी गर्द शिवांरी,
झरझर नाले ओथंबले...
लाल, पिवळ्या, हिरव्या
पानांवर मोती विसावले…!!


किमया मोठीच न्यारी,
सर्वत्र आनंदून बहरले,
रंगबिरंगी इंद्रधनुचे तोरण
नभोमंडपी सजले...!!


ऊन पावसाच्या सरी
लपंडाव सुरू झाले..
तुझ्या येण्याने पाहा
बालचमुही खेळात रंगले...!!



- अलका सानप, मुंबई
Comments
Add Comment

ऋषी लोमश

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे प्रदीर्घ दीर्घायुष्य लाभलेले महर्षी म्हणून पुराणात यांचा उल्लेख आहे.

विमा : हमी की फसवणूक?

संवाद : निशा वर्तक  “इन्शुरन्स काढा…, भविष्य सुरक्षित ठेवा…” हे वाक्य आपण किती सहज ऐकतो! आजारपण, अपघात,

नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे खूप पूर्वी भारतीय कुटुंबसंस्था अतिशय मजबूत होती. ती जवळजवळ अभेद्यच आहे असे

मित्र नको, बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू असे कोणते बाबा असतात का ज्यांना मुलांवर प्रेम करायला आवडत नाही. मुलांनी आपल्याला

महापालिकांत चुरस

विशेष : डॉ. अशोक चौसाळकर  महापालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात जोरदार लढत रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि

‌ध्रुव ६४ : भारताचे धुरंधर यश

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर भारताने स्वतःचे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर विकसित करण्याच्या प्रवासातील एक