Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

सुरतमध्ये बहुमजली इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू

सुरतमध्ये बहुमजली इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू

सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ बचावकार्यात व्यस्त आहेत. रात्रभरापासून येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत इमारतीच्या मलब्यातून ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी काही जण मलब्याखाली दबल्याची शक्यता आहे.


या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी, सुरत महानगरपालिकेचे महापौर दक्षेश मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजप आमदार संदीप देसाई आणि विरोधी पक्ष नेते पायल साकरिया यांच्यासह अन्य नेतेही घटनास्थळी पोहोचले.


 


मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत जुनी झाली होती. त्यामुळे अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. यात ३५ खोल्या होत्या. यात पाच ते सात कुटुंब आपले प्राण जोखीमध्ये टाकून राह होते.



पावसामुळे कोसळली इमारत?


दरम्यान, इमारत कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, जोरदार पावसामुळे जीर्ण झालेली ही इमारत कोसळल्याचे सांगितले जात आहे. इमारतीच्या मलब्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment