मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे. यासोबतच ब्रांडने त्यांच्या प्लान्सची संख्याही कमी केली आहे. यासोबतच जिओ अनलिमिटेड ५जी डेटा मिळत होता. कंपनीचे प्लान आता एकूण १९ प्लान येतात यात अनलिमिटेड ५ जी डेटा मिळतो.
यात १६ स्टँडर्ड रिचार्ज प्लान्स आहेत तर ३ डेटा बूस्टर आहेत. हे सर्व प्लान्स जिओच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जाणून घेऊया जिओच्या अनलिमिटेड ५जी डेटाचे प्लान डिटेल्स…
या प्लान्समध्ये मिळतात जिओ अनलिमिटेड ५जी डेटा
अनलिमिटेड ५ जी डेटाचा सगळ्यात स्वस्त प्लान ३४९ रूपयांचा आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. दुसरा प्लान ३९९ रूपयांचा आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते आणि २.५ जीबी डेटा मिळतो.
या सर्व प्लान्समध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोजचे १०० एसएमएस डेटासह जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये तिसरा प्लान ४४९ रूपयांचा आहे. यात २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा मिळतो.
८४ दिवसांची व्हॅलिडिटी
पुढील प्लान ६२९ रूपयांचा आहे. यात युजर्सला ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते तसेच २ जीबी डेटा मिळतो. तर ७१९ रूपयांच्या प्लानमध्ये कंपनी ७० दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो.