Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमPune Crime : पुणे पुन्हा हादरलं! चक्क महिला पोलिसाच्या अंगावर पेट्रोल ओतून...

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! चक्क महिला पोलिसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

आरोपीला तात्काळ अटक

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी काही थांबायचे नाव घेत नाही. पुण्यात कोयता गॅंगची दहशत, हाणामारी, खूनखराबा, गोळीबार अशा सातत्याने होत असलेल्या चित्रविचित्र घटनांमुळे पुणे पार हादरुन गेलं आहे. त्यातच आता पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला वाहतूक पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर पेट्रोल टाकून चक्क तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण पुणेच नव्हेतर अवघा महाराष्ट्र पुरता हादरून गेला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे. आरोपी संजय फकिरा साळवे (राहणार, पिंपरी चिंचवड, मूळगाव- जालना) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

नेमकं घडलं काय? 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ज्या काही घटना घडत आहेत. त्या घटनाच्यां पार्श्वभूमीवर पोलिसांना वरिष्ठांकडून रात्रीच्या वेळी बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना थांबून त्यांची तपासणी देखील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. अशीच नाकाबंदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं एका गाडीला थांबवलं, गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर ड्रायव्हरनं महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -