Wednesday, July 17, 2024
Homeक्राईमAkola news : भयंकर! शाळेतील आचाऱ्याने ९ वर्षीय विद्यार्थिनीवर केला अतिप्रसंग

Akola news : भयंकर! शाळेतील आचाऱ्याने ९ वर्षीय विद्यार्थिनीवर केला अतिप्रसंग

अकोला जिल्हापरिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

अकोला : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेक चित्रविचित्र घटना सातत्याने समोर येत असतात. त्यातच आता अकोल्याच्या जिल्हापरिषद शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालेय पोषण आहार बनवणाऱ्या एका ५२ वर्षीय कर्मचाऱ्याने शाळेतील ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकोला पोलिसांनी आरोपीविरोधात बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. चंद्रमणी (वय ५२) असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील एका प्राथामिक शाळेत पोषण आहार बनवण्याचे काम करणाऱ्या आरोपी चंद्रमणीने शाळेतील पीडित विद्यार्थिनीला खिचडी देण्याचं अमिष दाखवून एका खोलीत नेलं. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. ती सलग दोन-तीन दिवस शाळेतच गेली नाही. मुलगी शाळेत जात नसल्याने आईने तिला याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईजवळ कथन केला.

मुलीने सांगितलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने शाळेत धाव घेऊन याबाबत मुख्याद्यापकांना जाब विचारला. प्रकरण शाळेत पोहोचल्याचं कळताच आरोपी चंद्रमणी याने तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिलियन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -