मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर सपोर्ट स्टाफने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या दरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंशी चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी क्रिकेटमधील त्यांच्या यशाबद्दल इतर स्पोर्ट्समधील यशाबद्दल चर्चा केली. याशिवाय पंतप्रधान मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ बद्दलही चर्चा केली. या ऑलिम्पिकचे आयोजन लॉस एंजेलिसला होणार आहे.
टीम इंडियाकडून ऑलिम्पिकमध्ये आशा
पंतप्रधान मोदींनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या आशांबद्दल सवाल केले तर राहुल द्रविडने म्हटले की ऑलिम्पिकमध्ये खेळणे क्रिकेटर्ससाठी मोठी गोष्ट असेल. सोबतच देश आणि मंडळासाठी मोठे यश असेल. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असणे ही गर्वाची गोष्ट आहे. माझी आशा आहे या संघाचे अनेक खेळाडू ऑलिम्पिक २०२८चा भाग असतील. अनेक तरूण खेळआडू असतील मात्र आमच्या नजरा सुवर्णपदक जिंकण्यावर असेल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपासून क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. गेल्या १०० वर्षांपासून क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग नाही आहे.