Thursday, June 12, 2025

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला संसर्ग झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्यातील अमिबा नाकातून त्याच्या शरीरात शिरला. मुलाच्या मेंदूमध्ये अमीबाचा संसर्ग पसरला.मेंदूच्या संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे.


यापूर्वी २१ मे रोजी मलप्पुरममधील ५ वर्षांच्या मुलीचा आणि २५ जून रोजी कन्नूर येथील १३ वर्षांच्या मुलीचा या धोकादायक अमिबामुळे मृत्यू झाला होता.


याला बोली भाषेत ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असेही म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला पीएएम (Primary amoebic meningoencephalitis) असे म्हणतात. केरळमध्ये गेल्या दोन महिन्यांत अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसमुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.


यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, पीएएम हा अमिबा किंवा नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या एकल-पेशी जीवामुळे होणारा मेंदूचा संसर्ग आहे. हा अमीबा तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या माती आणि उबदार गोड्या पाण्यात राहतो. याला सामान्यतः ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे म्हणतात कारण जेव्हा अमिबा असलेले पाणी नाकात जाते तेव्हा ते मेंदूला संक्रमित करते. ‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ म्हणजेच पीएएम या आजारात मेंदू खाणारा अमिबा मानवी मेंदूला संसर्ग करतो आणि मांस खातो.

Comments
Add Comment