Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी


भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका


सोलापूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त सध्या महाराष्ट्रातील शेकडो दिंड्या विठुरायाच्या भेटीला निघाल्या आहेत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची (Ashadhi Wari) मोठी गर्दी दिसून येत आहे. अशातच काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विठुरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी वारीत पायी सहभागी होणार असल्याची घोषणा केली. राहुल गांधींच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असताना साताऱ्यातील माजी खासदार रणजीत निंबाळकर (Ranjeet Nimbalkar) यांनी राहुल गांधींवर बोचरी टीका केली आहे.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांनी राहुल गांधींच्या या गोष्टीला विरोध केला आहे. राहुल गांधी केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांवर केली.



काय म्हणाले रणजीत निंबाळकर?


रणजीत निंबाळकर म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाने या भोळ्या भाबड्या वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करू नये. आजवर राहुल गांधी यांना कधी विठ्ठल अथवा कोणत्याही देवाची पालखी आठवली नाही. मात्र सध्याच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी पालखीत सहभागी होण्याचा चर्चा सुरू केल्या आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यासोबत पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारने कोट्यावधींचा निधी वारकरी संप्रदायाला दिला आहे. मात्र यात कोणताही राजकीय वापर केला नसल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे.

Comments
Add Comment