Monday, May 19, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

Pune Crime : पैसे परत न केल्याने डॉक्टरने कोयत्याने केला तरुणाचा खून!

Pune Crime : पैसे परत न केल्याने डॉक्टरने कोयत्याने केला तरुणाचा खून!

गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य


पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime) समोर येत असतात. कधी गुन्हेगारी, कधी हाणामारी, कधी कोयता गँगची (Koyta Gang) दहशत तर कधी खून या सगळ्या प्रकारांमुळे पुणे पार हादरुन गेलं असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. घेतलेले पैसे परत न दिल्याने पुण्यातील एका डॉक्टरने गुंडांच्या साथीने एका तरुणाचा थेट कोयत्याने वार करत खून केला. या घटनेने पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या दोन गुंड साथीदारांनी मिळून प्रितेश बाफना यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. संबंधित फिर्यादी तरुणाने डॉक्टर विवेक गुप्ताकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे वेळेत परत न केल्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यामध्ये आता डॉक्टरांनी सुद्धा कोयता हातात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाघोलीमधील लोणीकंद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत पसरली आहे. कोयत्याने दिवसाढवळ्या हल्ले होत असल्याने कोयता गँगचा सुफडासाफ करावा, अशी मागणी पुणेकराकंडून होत असतानाच आता थेट शिकलेला डॉक्टर कोयता घेऊन रस्त्यावर उतरल्याने पुणे कोणत्या दिशेनं चाललं आहे याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


Comments
Add Comment