Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीNEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार ‘ही’ खास काळजी

मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास १३ दिवसांनी, राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा, पदव्युत्तर (NEET PG) च्या सुधारित परीक्षेची तारीख आज जाहीर झाली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) आता ११ ऑगस्ट रोजी NEET PG परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. NEET PG 2024 दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.

नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या अनियमिततेच्या आरोपांमुळे NBEMSने सावधगिरीचा उपाय म्हणून २३ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली. देशभरात सुमारे ५२,००० पदव्युत्तर जागांसाठी दरवर्षी सुमारे दोन लाख एमबीबीएस पदवीधर NEET PG परीक्षा देतात. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, परीक्षा रद्द करण्यात आली कारण मंत्रालयाला परीक्षा प्रक्रियेची मजबूती तपासायची होती आणि प्रक्रियेत कोणतीही असुरक्षितता नाही याची खात्री करायची होती.

मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेसंदर्भात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्रालयाची महत्वाची बैठक झाली. नीट परीक्षा एनटी ऐवजी आता एनव्हीईमार्फत घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ३ तास आधी प्रश्नपत्रिका तयार होणार असल्याची माहिती मिळत आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने NEET PG च्या नवीन परीक्षेच्या तारखेची नोटीस जारी केली आहे. ही परीक्षा आता ११ ऑगस्ट २०१४ रोजी घेतली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -