
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यात ४ इंचाचा मोठा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोल्डेबल स्मार्टफोन Qualcomm के Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरवर चालतो. हा वॉटर रेझिस्टंससाठी IPX8 रेटेड आहे. फोनमध्ये 4,000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.
Motorola Razr 50 Ultra च्या सिंगल 12GB RAM + 512GB व्हेरिेएंटची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यात मिडनाइट ब्लू, स्प्रिंग ग्रीन आणि पीच फज कलर ऑप्शनमध्ये देण्यात आला आहे.
याची विक्री अॅमेझॉन प्राईम डे २०२४ सेलदरम्यान होईल. हा सेल २० जुलैपासून सुरू होईल. हा फोन ग्राहक मोटोरोलाची साईट तसेच रिटेल स्टोर्समधूनही खरेदी करू शकतील. यात रिलायन्स डिजीटलचाही समावेश आहे.
कंपनीने ग्राहकांसाठी ५ हजार रूपयांची विशेष सूट सादर केली आहे. त्यामुळे याची किंमत ९४४,९९९ रूपये असेल. याशिवाय खरेदीदार बँक कार्डच्या माध्यमातून ५ हजार रूपयांचा इन्स्टंट बँक डिस्काऊंटचा फायदा उचलू शकतात.