Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीCycle Wari : पंढरीच्या वारीसाठी नाशिककरांची सायकलस्वारी!

Cycle Wari : पंढरीच्या वारीसाठी नाशिककरांची सायकलस्वारी!

एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग

नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) जातात. अशातच नाशिकमधून गेल्या बारा वर्षांपासून नाशिककर विठूरायाच्या दर्शनासाठी सायकलवारीने (Cycle Wari) पंढरपूरला जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठू माऊलीचा नामघोष करत सायकलिस्ट सायकलने नाशिक ते पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. विशेषत: यावेळी या सायकलवारीमध्ये एक दिव्यांग सहभागी झाला असून तो एका पायानेच सायकल चालवून वारीमध्ये सहभागी झाला आहे.

सायकल वारीचे आयोजन संस्थापक हरीश बैजल सर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर वारी घेण्यात येते. यंदाचे या सायकलवारीचे १२वे वर्ष असून ३०० सायकल वारकरी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये एक दिव्यांग व्यक्तीसह ४० महिलांचाही समावेश आहे. आज सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून सहाच्या सुमारास या सायकल वारीची सुरुवात करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव , एवरेस्ट वीर द्वारका डोखे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकचे सहसंचालक संजय बारकुंड, रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन हे उपस्थित होते.

ढोल ताशाच्या गजरात उत्साहवर्धक वातावरण

आज सकाळी ढोल ताशाच्या गजरात सर्व उपस्थित मान्यवरांनी सायकल वारकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी विठ्ठलाचा टिळा लावण्यात आला. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा व वारीचा ध्वज घेऊन सायकलिस्ट च्या आगमनानंतर मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल आरती झाली. त्यानंतर श्रीफळ अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात, माऊली, माऊली, गजर करत हिरवा झेंडा दाखवून सायकल वारीची सुरुवात झाली. रिमझिम पावसाची सुरुवात झाल्यामुळे उत्साहात अधिकच भर पडली.

सिन्नरचा घाट पार केल्यानंतर सिन्नर सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सायकलपटूंचे स्वागत करण्यात आले. अमली पदार्थ मुक्त देश व्हावा यासाठी सामाजिक संदेश घेऊन ही वारी आयोजित केल्याबद्दल नाशिक सायकलिस्टचे विशेष कौतुक करण्यात आले. दिव्यांग सायकलिस्ट सुनील पवार यांचा विशेष सत्कार केला. आज ही सायकल स्वारी १६० किलोमीटर अंतर पार करणार असून त्यानंतर त्यांची अहिल्यानगर येथे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -