Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीVasant More : प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात! पुण्यात वसंत मोरेंविरुद्ध वंचित आक्रमक

Vasant More : प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात! पुण्यात वसंत मोरेंविरुद्ध वंचित आक्रमक

वसंत मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरच करणार आंदोलन

पुणे : गेल्या काही महिन्यांतच वसंत मोरे (Vasant More) यांनी घेतलेल्या विविध भूमिकांमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कालच त्यांनी ठाकरे गटासोबत (Thackeray Group) जाण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वसंत मोरे यांनी पुण्याच्या जागेवर वंचितकडून लोकसभा (Pune Loksabha) निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला व आता त्यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचा उमेदवारही पुण्यातून मोरेंविरोधात उभा होता, त्यात आता वंचितची साथ सोडल्याने वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा विश्वासघात केला, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

लोकशभा निवडणुकीआधी वसंत मोरे निष्ठावान मनसैनिक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अनेक कामांमध्ये साथ दिली होती. मनसेतील अंतर्गत राजकारणामुळे बाहेर पडताना देखील ते भावूक झाले होते. यानंतर पुण्यातून लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, मात्र तिथून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. त्यांना वंचितकडून लोकसभेचं तिकीट मिळालं पण त्यांचा पराभव झाला. यानंतर वसंत मोरे यांनी काल पुन्हा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आता ते ठाकरे गटात ९ जुलै रोजी पक्षप्रवेश करणार आहेत.

वसंत मोरे यांची ही बाब वंचित बहुजन आघाडीच्या फारशी पचनी पडलेली नाही. त्यामुळे वंचितच्या पुण्यातील कार्यकर्त्यांकडून कात्रज येथील वसंत मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरच आंदोलन करण्यात येणार आहे. वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाशी केलेली फसवणूक व आदरणीय नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांचा केलेला विश्वासघात या घटनांच्या निषेधार्थ वसंत मोरे यांचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी/युवा आघाडी/महिला आघाडी/माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असा संदेश वंचितच्या कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.

वसंत मोरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार

विधानसभा निवडणुकीसाठी मला दोन पर्याय आहेत. आगामी निवडणूक खडकवासला आणि हडपसर, दोन्हींकडून लढू शकतो. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता तरीही मला चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे, १० नगरसेवक आहेत. बाहेर त्यांची ताकद आहे, असे वसंत मोरे यांनी म्हटले होते. त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले वसंत मोरे आता पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -