Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीZika Virus : झिकाचा वाढता थरार! राज्यभरात आठ जणांना व्हायरसचा प्रादुर्भाव

Zika Virus : झिकाचा वाढता थरार! राज्यभरात आठ जणांना व्हायरसचा प्रादुर्भाव

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात पहिला झिकाचा (Zika Virus) रुग्ण आढळला होता. त्यानंतर एकामागोमाग एक असे सहा जणांना झिकाची लागण झाल्याने समोर आले होते. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु आता झिका व्हायरस केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभर पसरला आहे. राज्यात झिका व्हायरसचा धोका वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यात झिका व्हायरसचे एकूण आठ रुग्ण आढळले आहेत. झिका व्हायरस बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व नागरिकांची धाकधूक वाढत चालल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा, एंरडवनमध्ये झिकाचे रुग्ण आढळले. त्यानंतर कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक असा झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. राज्यभरात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Union Health Ministry) राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार झिका विषाणूच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे असे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले.

गर्भवतींसाठी विशेष सूचना

झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो. यामुळे गर्भवती महिलांचे झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोग्य सुविधा आणि देखरेख

आरोग्य सुविधांनी आपल्या परिसरात एडिस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम स्थळे, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख बळकट करावी आणि रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबवणे,असे म्हटले आहे.

झिकाचा प्रसार कशामुळे होतो?

  • लैंगिक संपर्काद्वारे
  • गर्भधारणेदरम्यान
  • आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो.
  • रक्त आणि रक्त उत्पादनांचे संक्रमण अवयव प्रत्यारोपणाद्वारे

निदान कुठे होते?

राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छ. संभाजीनगर येथे झिकाच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे.

उपचार पद्धती

  • रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
  • निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
  • तापाकरिता पॅरासिटामॉल घ्यावे.
  • ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -