
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या लाखो चाहत्यांनी अॅम्ब्युलन्सल वाट करून देत मानवतेचे दर्शन दिले.
लाखोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीने अॅम्ब्युलन्सला वाट करून देत मानवतेचे तसेच धैर्यतेचे दर्शन दिले. लोकांनी बाजूला होत अॅम्ब्युलन्सला मोकळी वाट करून दिली. यावरून मुंबईकरांच्या एकतेचे दर्शन पाहायला मिळाले. तसेच एखाद्याच्या मदतीसाठी लाखो लोक मानसिकरित्या कसे एकत्र येऊ शकतात हे ही या कृतीतून दिसले.
#WATCH | Mumbai: Cricket fans gathered at Marine Drive make way for an ambulance to pass through the crowd.
Team India - the #T20WorldCup2024 champions - will have a victory parade here shortly. pic.twitter.com/WvTN7z1J7z
— ANI (@ANI) July 4, 2024
टीम इंडियाने २९ जूनला खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकांत रोमहर्षक पद्धतीने हरवले होते. यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने इतिहास रचला. भारताने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपचा खिताब आपल्या नावे केला. १३ वर्षांनी आयसीसी वर्ल्डकप ट्रॉफी भारतात आली.
याआधी २०११मध्ये भारताने ५० षटकांचा वर्ल्डकप आपल्या नावे केला होता. भारतात पोहोचताच सगळ्यात आधी टीम इंडिया दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटली. यानंतर संध्याकाळी ते विजयी परेडसाठी मुंबईत पोहोचले. येथे त्यांचे भव्य स्वागत केले जात आहे.