Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलिस बडतर्फ

ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलिस बडतर्फ

चौकशीत दोषी आढळल्याने पोलिस आयुक्तांनी दिला आदेश

पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या दोन पोलिसांना पोलिस आयुक्तांनी बडतर्फ केले आहे. या प्रकरणात पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.

पोलिस हवालदार आदेश शिवणकर आणि पिरप्पा बनसोडे अशी बडतर्फ केलेल्या दोघांची नावे आहेत. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. चौकशीत ते दोषी आढळल्याने त्यांना सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्यात ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांसह १५ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेने तीन हजार १५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तर पाटील आणि त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या सचिन वाघ या दोघांवर पोलिसांकडून तब्बल दोन हजार ६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पाटील याने पळून जाण्यापूर्वी तीन महिने आधीपासूनच पसार होण्याच्या प्लॅन केला होता. तो पळून गेला त्यावेळी त्याचा चालक सचिन वाघ त्याच्यासोबत होता.

या गुन्ह्यात ससून येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते, येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे, ललितच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम (वय ३३) आणि ॲड. प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय ३९, दोघीही रा. नाशिक), ललितचा भाऊ भूषण पाटील (वय ३४ ), साथीदार अभिषेक बलकवडे (वय ३१, सर्व रा. नाशिक), रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अऱ्हाना (वय ५०, रा. कॅम्प) आणि त्याचा चालक दत्तात्रेय डोके (वय ४०, रा. हडपसर) यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती.

ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून तो पळून गेल्यानंतर त्याची माहिती नियंत्रण कक्षाला तब्बल तीन तास उशिराने देण्यात आली होती. दोन्ही पोलिस कर्मचारी ललित पाटील सोबत एक्स-रे काढण्यासाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. या शिवाय घटनेची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला दिली असती तर पळून गेलेल्या ललित पाटीलला पकडता आले असते. मात्र, या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास न कळविल्यामुळे ललित पाटील याला पळून जाण्यास संधी मिळाली, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -