Sunday, June 22, 2025

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले आहेत.


ही विजयी परेड मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत असणार आहे. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर लाखोंच्या संख्येने चाहते पोहोचले आहे.


भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४चा खिताब जिंकत सकाळीच दिल्लीत दाखल झाला. टीम इंडिया एअरपोर्टवर सरळ हॉटेलला गेली. येथे चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. टीम इंडियासाठी गुरूवारचा दिवस हा व्यस्त आहे.






टीम इंडियाने सगळ्यात आधी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर संघ मुंबईसाठी रवाना झाला. ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी परेड काढण्यात आली आहे.


टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत खिताब पटकावला होता. फायनल सामना अतिशय अटीतटीचा रंगला होता. या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. याआधी २००७मध्ये भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळीही धोनी अँड कंपनीचे मुंबईत जोरदार स्वागत झाले होते.

Comments
Add Comment