Saturday, July 6, 2024
Homeक्रीडाTeam india: टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन टीम इंडिया भारतात दाखल

Team india: टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन टीम इंडिया भारतात दाखल

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) जिंकल्यानंतर आज मायदेशात परतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया बार्बाडोस येथून घरी परतली आहे. भारताने स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत खिताब आपल्या नावे केला होता. फायनल जिंकल्यानंतर टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती.

आता त्यांना स्पेशल फ्लाईटने भारतात परत आणण्यात आले. फ्लाईड दिल्ली येथे लँड झाली. एअर इंडियाच्या AIC24WC चार्टर्ड फ्लाईट चॅम्पियन्स आणि स्पोर्ट्स स्टाफला घेऊन आली. भारतात आल्यानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे.

आल्यानंतर रोहित अँड कंपनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतील. टीम इंडियाची पंतप्रधान मोदींशी भेट सकाळी ९ वाजता होईल. त्यानंतर टीम इंडिया दुसर्‍या चार्टर्ड फ्लाईटने मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईत भारतीय संघ ओपन बस परेड करणार आहे. याआधी धोनी अँड कंपनीने २००७मध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विजयी परेड केली होती.

परेडची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. ही परेड संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर असणार आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये प्रेझेंटेशन सेरेमनी असणार आहे.

टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून शनिवारी बार्बाडोसच्या केसिंग्टन ओव्हल मैदानात खेळवण्यात आला होता. यानंतर बार्बाडोसमध्ये वादळ आले होते. यामुळे टीम इंडिया तेथे अडकली होती. तीन दिवस त्यांना तेथे राहावे लागले. बार्बाडोसमध्ये वादळाचा प्रकोप इतका होता की तेथील एअरपोर्ट बंद करण्यात आले होते. तसेच कर्फ्यूची स्थिती निर्माण झाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -