मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले जाते. ज्योतिषानुसार यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. जेव्हा आपण एखाद्या खास कामासाठी घराबाहेर जाते. जसे प्रवासाला निघणे, परीक्षेसाठी अथवा इंटरव्ह्यूसाठी जातो तेव्हा घरातून निघण्याआधी हातावर दही-साखर ठेवली जाते.
अनेकदा तुमची आई, आजीनेही असे केले असेल. मात्र खरंच दही-साखर खाणे शुभ असते का?जाणून घेऊया या मागचे लॉजिक
खरंतर हिंदू धर्मात पाच अमृत तत्वांपैकी एक मानले गेले आहे. यामुळे दहीचे महत्त्व वाढते. अनेक धार्मिक कार्यांमध्ये दह्याचा वापर केला जातो. पंचामृतांमध्ये दही महत्त्वाचे आहे. भगवान शंकरालाही दहीने अभिषेक केला जातो.
ज्योतिषानुसार दही आणि साखर या दोन्हींचा रंग सफेद असतो. सफेद रंगाचा संबंध चंद्राशी असतो. अशातच दही आणि साखर खाल्ल्याने चंद्र ग्रहाकडून शुभ फल प्राप्ती होते.
चंद्राची स्थिती मजबूत झाल्याने कुंडलीतील भाग्य पक्ष मजबूत होतो आणि डोकेही थंड राहते. यामुळे व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते.
सोबतच दही-साखर खाणे हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण दह्यामध्ये विविध प्रकारचे व्हिटामिन्स असतात ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तर साखरेमध्ये ग्लुकोज असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.