Sunday, July 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Narendra Modi : लोकसभेनंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिला मुंबई दौरा!

PM Narendra Modi : लोकसभेनंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिला मुंबई दौरा!

‘या’ खास कारणासाठी येणार मुंबईत

मुंबई : सध्या देशभरात आगामी विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) वारे पसरले आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना महायुतीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच दौरा असणार आहे. त्यामुळे दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत हजारो कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी ६,३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्तावित १,१७० कोटी रुपयांच्या ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्गाच्या प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया सुविधांचाही समावेश असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -