Monday, July 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरेंना पण भोंदूबाबा म्हणायचंय का?

Nitesh Rane : संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरेंना पण भोंदूबाबा म्हणायचंय का?

आमदार नितेश राणे यांचा परखड सवाल

मुंबई : ‘आज सकाळी मोदीजींना भोंदूबाबा म्हणण्याची हिंमत या संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) केली. भगवे वस्त्र घालून गुफांमध्ये जाऊन बसणारे, हिंदू-मुसलमान करणारे हे भोंदूबाबा असतात असं संजय राऊतचं म्हणणं आहे. म्हणजे अप्रत्यक्ष ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही (Balasaheb Thackeray) भोंदूबाबा म्हणत आहेत का?’ असा परखड सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. हाथरस दुर्घटनेनंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेमुळे नितेश राणे यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, बाळासाहेबांनी नेहमीच हिंदुत्वाची बाजू लावून धरली. भगवे वस्त्र घालून हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेबांच्या पूर्ण आयुष्याचा प्रवास होता. असंख्य मोठ्यातले मोठे धर्मगुरु, महाराज हे मातोश्रीला यायचे, बाळासाहेबांना भेटायचे, मग या सगळ्या विषयाला संजय राऊत भोंदू म्हणणार का? असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले, खारघर येथे धर्माधिकारी यांचा जो कार्यक्रम झाला, आदरणीय धर्माधिकारी आणि त्यांची संस्था समाजकार्य करतात, लोकांची मदत करतात, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतात. त्याच्या ५ टक्के काम देखील संजय राऊत आणि त्याच्या मालकाने केलं नसेल. स्वतः उद्धव ठाकरे हे असंख्य वेळा माननीय धर्माधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन आले आहेत. त्यामुळे आधी तुझ्या मालकाला सांग की धर्माधिकारींकडे जाऊन आशीर्वाद घेणं बंद कर, आणि मग दुसऱ्यांना भोंदूबाबा बोल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

नितेश राणे यांनी संजय राऊतांना सल्ला दिला की, कधीतरी धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीला जाऊन बस, तुझेपण विचार थोडे स्पष्ट होतील, चांगल्या मार्गाला लागशील, वाया गेलेला कार्टा म्हणून तुझी जी ओळख आहे ते धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे तुझ्या विचारांमध्ये आणि व्यक्तिमत्त्वामध्ये निश्चित बदल होईल, असं नितेश राणे म्हणाले.

इंडिया आघाडीवाल्यांना भारत देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे

इंडिया आघाडीवाले सगळे मुस्लिम लीगची भाषा करणारे पाकिस्तानचे एजंट आहेत. जी भावना पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या बाबतीत बोलली जाते, तिकडचे अतिरेकी आणि नेतेमंडळी जी भाषा बोलतात, २०४७ मध्ये इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी सीमी, आयएसआय वगैरे संघटना काम करतायत, त्याच पद्धतीचे जिहादी विचार हे राहुल गांधी आणि संजय राऊत या लोकांचे आहेत. या लोकांना आपल्या भारत देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

आमच्या सरकारचा सर्वात लाडका शेतकरीच

कदाचित त्याने जर त्याचं भांडुपचं घर सोडलं असतं, मालकाने मातोश्री सोडली असती आणि खरंच बांधावर जाऊन शेतकऱ्याला आमचं केंद्र आणि राज्य सरकार किती मदत करतंय, याचा थोडा अनुभव घेतला असता तर त्यांना कळलं असतं की आमच्या सरकारचा सर्वात लाडका हा शेतकरीच आहे, असं नितेश राणे म्हणाले.

मोदीजी फक्त मणिपूरवर बोलले नाहीत, तर…

मोदीजी फक्त मणिपूरवर बोलले नाहीत, तर मोदीजींनी मणिपूरमध्ये परिवर्तन आणण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही जर मातोश्री आणि भांडुप सोडून स्वतः मणिपूरमध्ये जाऊन पाहिलं असतं, तर आज मणिपूरमध्ये परिस्थिती कशी बदलतेय, त्या ठिकाणी कशी शांतता नांदतेय, हे तुम्हाला खुल्या डोळ्यांनी पाहता आलं असतं, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -