समर्थ कृपा – विलास खानोलकर
श्री स्वामींच्या भक्तांचे कार्यच मुळी नि:स्वार्थपणे चाले. ते म्हणत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्हीच आमच्या आयुष्याला दिलात परिपूर्ण अर्थ, परिपूर्ण अर्थ!
कर्दळीवनातून बाहेर पडल्यावर, श्री स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती वाटेतील अनेक रम्य स्थळे, नर्मदा, गंगा किनारी करत, अनेक पर्वत, देवळे, लेण्या ओलांडत ओलांडत १८५७च्या दरम्यान अक्कलकोट येथे आली. या लांबलचक अनेक योजने पायी चालल्याच्या हकीगतीचे वर्णन स्वत: श्री स्वामी समर्थांच्या प्रभावी तेज:पुंज मुखातून ऐकले, त्याचे वर्णन खालील प्रमाणे :-
एकदा एक कोलकात्त्याचा पारशी गृहस्थ त्यांच्या दुसऱ्या एका प्रवाशाबरोबर स्वामींच्या दर्शनाला आला व त्याचा नेहमीच्या अतिचिकित्सक व खोचून प्रश्न विचारण्याच्या स्वभावाप्रमाणे, स्वामीच्या पायावर फळे ठेवली व त्याने स्वामींना विचारले, स्वामी महाराज आपण कोठून आलात, आपले गाव कोणते?
त्यावर स्वामी समर्थांनी लागलीच त्याला ठणकावून सांगितले,
‘‘ प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो, नर्मदा किनारी फिरलो, नंतर गंगा किनारीही काशी, गया, बोधी गया, वाराणसी फिरून पुढे कोलकात्त्यालाही आलो. तेथे कालीमातेचेही दर्शन घेतले. नंतर हरीद्वार, चारधाम व केदारेश्वरही पाहिले. त्यानंतर आम्ही गोदावरी नदी तीरावर आलो. तेथेही बारा वर्षे राहिलो. नंतर मंगळवेढ्यास आलो. तेथेही बरीच वर्षे राहून, बेगमपूर येथे जाऊन मोहोळसही गेलो. पुरा मावळप्रांत, सोलापुरीवरून फिरत आलो. तेथे काही काळ राहून नुकताच अक्कलकोट स्थानी आलो. तो येथेच काही काळ स्थानापन्न आहे.’’
या सर्व प्रवासांच्या लांब लांबच्या स्थळांचीची माहिती मिळाल्यावर, आपल्याला कळते की, स्वामींनी नुसते भारत भ्रमण नाही, तर जुन्या हिंदुस्थानातील कोलकात्ता, बंगाल, चीन, हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पायी-पायी न थकता, सर्व देवस्थानांना भेट देत, तेथील जनतेलाही आपल्या विद्वत्तेची व अवतार कार्याची चुणूक दाखवत, यशस्वीपणे आसेतू हिमाचल भ्रमण केले होते. तेथील हिमालयाच्या पायथ्याशी एका चिनी प्रवासी दाम्पत्याबरोबरही चिनी भाषेतच चित्र लिपीत केले. त्याची प्रश्न उत्तरे, बरोबर देऊन त्याच्या मनावर ठसवले की, देव सर्व जगात पृथ्वीतलावर आसेतू हिमाचल एकच आहे, त्याला तुम्ही नाव काहीही द्या! त्याच्या परवानगीशिवाय या पृथ्वीतलावरील झाडाचे पानही हलू शकत नाही.
त्या किड्या -मुंग्यांना सुद्धा देवच जेवायला घालतो. तुमच्या मानवाच्या हातात फक्त इतरांची प्रेमाने सेवा करणे, हाच गुण सांभाळायला हवा. कोणालाही मी ताकदवान आहे म्हणून जास्त मिजासखोरी करू नये. ‘सब भगवान एकही है।’ असे म्हणून त्या चिनीची दातखिळी बंद केली व त्याचे गर्वहरण केले. तसेच हिमालयात एका हरिणीच्या निष्पाप पाडसाचे पारध्यापासून व त्यांच्या विषारी बाणापासून मुक्ती केली. त्याचप्रमाणे एका तपोनिष्ट संन्यासास त्याच्या भयंकर तपामुळे, त्यालाच फक्त दत्त रुपात दर्शन दिले. म्हणूनच भक्त नेहमी उत्साहाने म्हणत असतात, अनंत कोटी, अक्कलकोटी राजाधिराज स्वामी समर्थ महाराज की जय!!!
स्वामींचा संदेश :- भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी आणि गरिबांना मदत करा.
‘‘ जिथे कमी तिथे स्वामी ’’
श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेली भूमी म्हणजे अक्कलकोट. अक्कलकोट हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आहे. ते एक पवित्र प्रसिद्ध असे यात्रा स्थळ बनले आहे. दसरा, दिवाळी, देवदिवाळी, गुढीपाढवा, गुरुपौर्णिमा व नववर्ष दिन तसेच दर मंगळवार, गुरुवार, रविवार भक्तांची प्रचंड गर्दी होत असते. शासनाकडून अक्कलकोट स्वामींचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. स्वामी समर्थ मंदिरामध्ये आजसुद्धा भक्तांना स्वामी साक्षात दर्शन देत आहेत, असे भास होत असतात.
ज्या गोष्टी शंभर वर्षांपूर्वी स्वामी असताना घडले आहे, असे वाटत असते, ते आताच्या वर्तमानकाळातही पुन्हा घडत आहे, असे भक्तांना भास होत असतात. त्यामुळे भक्तांचा दृढविश्वास वाढतो, स्वामींवरची भक्ती वाढते व स्वामीच त्यांना यश देतात. सर्व संकटामध्ये तो निर्विघ्नपणे पार पडतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य संदेश ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या एकाच वाक्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा आपलेपणाचा भाव भक्तांच्या मनामध्ये ठासून बसतो. जिथे-तिथे, जळी, स्थळी, कष्टी, पाषाणी स्वामी समर्थांचा दिव्य सहवास आपल्याबरोबर आहे याची प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्र उच्चारांमध्ये प्रचंड दैवी शक्तीचा वास असल्याची प्रचिती भक्तांना येते. म्हणून आज संपूर्ण भारतात स्वामी भक्तीचा महिमा पसरत असल्याचे दिसून येते.
अक्कलकोटी उभा औदुंबर ।
प्रेम करे त्यावर सारे चराचर ।।१।।
मनात येता तुझीच भक्ती ।
अंगात येई हत्तीची शक्ती ।।२।।
मिळे भक्ता भरपूर शक्ती ।
तुझ्या कृपेची ती नवशक्ती ।।३।।
अजान बाहू तू खरा ईश्वर ।
तुझ्या कृपेचे गूढ ते जाणे ।।४।।
तुझ्याच अभक्तांचे देणे घेणे।
नाम घेता हरसी दुःख तेणे ।।५।।
असा तू अक्कलकोटीचा देव ।
जणू कैलासाचा प्रसन्न देव ।।६।।
तुझे नाम घेता प्रसन्न गणेश ।
खुश होती सारे ईश ।।८।।
तुझी भक्ती हीच शक्ती ।
दुबळ्यांना मिळे बहुत शक्ती ।।९।।
तू सर्व देवांचा महादेव ।
वंदन करिती सारे देव ।।१०।।
कुणी करिती कुटील निती ।
तव द्रव्याचा लोभ दाविती ।।११।।
मिथ्या भक्तीचा आव आणिती ।
कृपा न मिळे बिलकुल प्राप्ती।।१२।।
मनापासूनी तुला जे पुजती ।
त्यांना न भय कधी ना भीती ।।१३।।
पुण्य मार्ग तेच जाती ।
जे दिनरात स्वामी महती गाती ।।१४।।
!! बोला स्वामीसमर्थ महाराज कि जय !!