Monday, May 12, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात चिया सीड्स मिसळून प्या, शरीरात दिसतील हे बदल

रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात चिया सीड्स मिसळून प्या, शरीरात दिसतील हे बदल

मुंबई: मॉडर्न लाईफस्टाईलमुळे एकीकडे जिथे गोष्टी सोप्या झाल्या आहेत तर दुसरीकडे आपले खाणेपिणे आणि लाईफस्टाईल खराब झाली आहे. या लाईफस्टाईलमुळे स्वत:ला फिट ठेवणे अतिशय कठीण झाले आहे. आपले आरोग्य चांगले खाण्यासाठी आम्ही तुम्हाला एका खास ड्रिंकबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या डेली रूटीनमध्ये सामील करू शकता.



डिहायड्रेशनपासून होतो बचाव


हे ड्रिंक रिकाम्या पोटी प्यायल्यास खूप फायदा होतो. हे प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो.



या ड्रिंकमध्ये असतात अनेक पोषकतत्व


हे ड्रिंक यासाठी फायदेशीर आहे कारण यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमसह अनेक पोषकतत्वे असतात. जर तुम्ही सकाळच्या वेळेस कोमट पाणी पित असाल तर त्यात लिंबाचा रस आणि चिया सीड्स टाकून पिऊ शकता.



चिया सीड्स काय असतात?


खरंतर, चिया सीड्स छोटे काळे आणि सफेद रंगाचे असतात. या छोट्या बियांमध्ये क्वेरसेटिन नावाचे अंटीऑक्सिडंट असते. याच्या सेवनाने हृदयाच्या आजारासारख्या समस्यांशी लढण्यास मदत होते.यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. तसेच अनेक पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हाय बीपीचा धोका कमी होतो. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात.

Comments
Add Comment