Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीHathras stampede : हाथरस दुर्घटनेनंतर भोलेबाबा फरार! अखेर दुसऱ्या दिवशी दिली प्रतिक्रिया...

Hathras stampede : हाथरस दुर्घटनेनंतर भोलेबाबा फरार! अखेर दुसऱ्या दिवशी दिली प्रतिक्रिया…

भोलेबाबा बनण्याआधी होता उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल

१२१ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर ज्यांच्या सत्संगासाठी लोक जमले होते असे नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) मात्र फरार झाले होते. त्यांचा फोनही बंद होता. अखेर त्यांची या दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

या दुर्घटनेवर भोले बाबा म्हणाले की, हाथरसमध्ये चेंगराचेंगरीमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या आधीच ते तिथून निघून गेले होते. त्यांनी म्हटले की काही समाजकंटकांनी सत्संगाच्या ठिकाणी गोंधळ माजवला. याशिवाय त्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांबद्दल शोक भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी हेही सांगितले की याप्रकरणी त्यांनी वकील एपी सिंह यांची नियुक्ती केली आहे.

भोले बाबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, आमच्यावतीने याप्रकरणी ए.पी. सिंह वरिष्ठ अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय यांना अधिकृत केले जात आहे. जेणेकरून समागम/सत्संगानंतर काही असामाजिक तत्वांनी चेंगराचेंगरी निर्माण केल्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई करता येईल.

भोलेबाबा बनण्याआधी होता उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल

नारायण साकार विश्व हरि हा भोले बाबा बनण्यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल सूरज पाल सिंह या नावाने ओळखला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय सूरज पाल सिंह हा कासगंज जिल्ह्यातील बहादुर नगर गावातील एका दलित कुटुंबातील आहे. या घटनेनंतर आता त्याची खरी ओळख समोर आली आहे. एक दशकापर्यंत पोलिस दलात नोकरी केल्यानंतर भोले बाबाने नोकरी सोडली. त्याची अखेरची पोस्टिंग ही आग्रा येथे होती.

भोले बाबा याचं लग्न झालेलं असून त्यांना मुलं नहीत. सूरज पाल सिंहने पोलिसची नोकरी सोडल्यानंतर आपलं नाव भोले बाबा ठेवलं. त्याच्या पत्नीला माताश्री म्हणून ओळखलं जातं. भोले बाबाने पाच वर्षांपूर्वी गाव सोडलं.

योगी आदित्यनाथ यांनी दिले घटनेच्या चौकशीचे आदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली जात आहे. अलिगडचे पोलीस कमिश्नर यांना दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आहे की षडयंत्र हे जाणून घेण्यासाठी सरकार याच्या मुळापर्यंत जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -