Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीAirport Job : एअरपोर्टवर नोकरी करायचीय? मग 'ही' बातमी खास तुमच्यासाठी

Airport Job : एअरपोर्टवर नोकरी करायचीय? मग ‘ही’ बातमी खास तुमच्यासाठी

मुंबई विमानतळावर १ हजाराहून अधिक पदांची मेगाभरती; ‘असा’ करा अर्ज

मुंबई : अनेक तरुणांचे हवाई क्षेत्रात किंवा एअरपोर्टवर (Airport Job) नोकरी करण्याचे स्वप्न असते. मात्र अनेकवेळा याचे शिक्षण घेऊनही अनेकांना याठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळत नाही. अशाच काही तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ए आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये (Ai Airport Services Limited) १ हजाराहून अधिक पदांची भरती जारी केली आहे. जाणून घ्या रिक्त पदासाठी लागणारे पात्रतेचे निकष, वयोमार्यादा आणि वेतन याबाबत सविस्तर माहिती.

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम उत्तम सेवा पुरवून त्यांचा प्रवास सुखाचा करणे, केवळ भारतातच नाही तर जगभरात आपल्या कंपनीचे नाव मोठे करणे असे उद्देश समोर ठेवून एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड कार्यरत आहे. या कंपनीने सध्या १०४९ रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. भारतीय महिला आणि पुरुष या दोघांसाठी ही भरती होणार असून नोकरीचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. तीन वर्षानंतर कार्यरत उमेदवाराचा कामातील परफॉर्मन्स पाहून त्याचा पुढील कार्यकाळ ठरवला जाणार आहे.

‘या’ पदांसाठी भरती

 • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ७०६ जागा
 • सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ३४३ जागा

पात्रतेचे निकष

 • कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत
 • संबंधित कामातील किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक
 • संगणक वापरासंबंधीचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
 • लेखनात आणि बोलण्यात हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक
 • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह पदासाठी वैमानिक अभ्यासक्रमांमधला डिप्लोमा केलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा

 • सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी वयोमर्यादा ३३ वर्षे असावी.
 • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असावी.
 • त्याचबरोबर ओबीसी श्रेणीतील अर्जदारांना तीन वर्षाची तर एससी आणि एसटी श्रेणीतील अर्जदारांना पाच वर्षांची अधिक सूट देण्यात येईल.

वेतन

दोन्ही पदांमधील पात्र उमेदवारांना २८ हजार ६०५ रुपये इतका पगार दर महिना दिला जाईल.

अर्जाची लिंक

 • उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScA4WF8Ej8bKu7VwMMOzRhSoYuQSVjD9CFWYZynC_1llrUZVQ/viewform ही लिंक असणार आहे.
 • ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मधील नोकरीच्या इतर संधी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.aiasl.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -