Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता, दागदागिने; शिक्षण दहावी...

उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता, दागदागिने; शिक्षण दहावी मात्र स्वतःच्या नावावर कोणतेही वाहन नाही!

मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना संधी दिली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्ती, शिक्षण व त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती दिली आहे.

नार्वेकर यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. तरीही त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.

मिलिंद नार्वेकर यांनी शेयर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. श्री बालाजी कॉम. एलएलपी कंपनी आहे. त्यात ५० टक्के शेयर्स त्यांचे तर पत्नीचे ५० टक्के शेयर्स आहेत. त्यांनी १० कोटी ११ लाख २८ हजार रुपयांचे तर त्यांच्या पत्नीने ३१ कोटी २५ लाख ३३ हजार रुपयांची गुंतवणूक शेयरमध्ये केली आहे.

नार्वेकर यांच्याकडे ४५ हजार रुपये रोख तर त्यांच्या पत्नीकडे ३६ हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्या बँक खात्यात ७४ लाख १३ हजार २४३ रक्कम तर पत्नीच्या बँक खात्यात ८ कोटी २२ लाख ११८ इतकी रक्कम आहे. नार्वेकर यांनी बॉण्ड्स आणि म्युचल फंडमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्यांनी ५० तर त्यांच्या पत्नीने १२ कोटी ४० लाख ८२ हजार ५२६ कोटी रुपये बॉन्ड आणि म्युचुयल फंडमध्ये गुंतवले आहे. तर पोस्ट ऑफिस व पॉलिसीमध्ये देखील मिलिंद नार्वेकर यांनी ३ लाख ६८ हजार ७२९ रुपये गुंतवले आहेत. तर त्यांच्या पत्नीचे ६७ लाख ८८ हजार ५५८ रुपये गुंतवले आहेत.

मिलिंद नार्वेकर यांच्या मालकीची कोकण व बीडमध्ये जमीन आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड (तालुका दापोली) येथे ७४.८० एकर जमीन आहे. यात त्यांच्या पत्नीचा ५० टक्के वाटा आहे. तर बीड जिल्ह्यात बाणेवाडी येथे ०.१९ एकर जमीन आहे. आणि बंगळूर येथे त्यांच्या पत्नीच्या नावावर २३२५ स्क्वेअर फूट जमीन आहे. तर मुंबईत मालाड व बोरिवली येथे १००० स्क्वेअर फुटाचे घर असून पत्नीच्या नावावर अलिबाग येथे फार्म हाऊस आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे ४ कोटी १७ लाख ६३ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे ११ कोटी ७४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

मिलिंद नार्वेकर व त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधी रुपयांचे दागिने आहेत. यात सोने चांदी व हिऱ्यांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे ३५५.९४ ग्रॅम सोने आहे. त्याची बाजार भावाप्रमाणे २४ लाख ६७ हजार ९८१ रुपये किंमत आहे. तर चांदी १२.५६ किलोग्रॅम आहे. त्याची किंमत ९ लाख ७४ हजार ६५६ रुपये आहेत. तर ८०.९३ हीरे असून त्याची किंमत ही ३६ लाख ८५ हजार आहे. नार्वेकर यांच्या पत्नीकडे ७१ लाख २८ हजार रुपयांचे दागिने आहेत. ४२५ ग्रॅम सोने असून त्याची किंमत २९ लाख २६ हजार रुपये, चांदी ६.२६ किलो असून तयाची किंमत ४ लाख ८५ हजार आहे. तर हिरे ९०.९६ असून त्याची किंमत ३३ लाख ४९ हजार रुपये आहे.

मिलिंद नार्वेकर आणि पत्नीचे उत्पनाचे साधन वैयक्तिक पगार, घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न आहे. त्यांच्यावर २६ लाख ३८ हजार १६० रुपये कर्ज, तर पत्नीवर ३ कोटी २२ लाख ४५ हजार रुपये कर्ज आहे. १ कोटी ५४ लाख ८१ हजार ९८९ रुपये बँकेचे कर्ज आहे. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावावर कोणतेही वाहन नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -