Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीNutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार (Nutrition Food) योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवण्यात येणारा माल निकृष्ट दर्जाचा असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अंगणवाडीतील (Anganvadi) लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि उंदराच्या लेंड्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. हे प्रकरण ज्वलंत असताना आता सांगली येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या पलूस येथे महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात वाळा जातीच्या सापाचे मृत पिल्लू आढळून आले आहे. पलूस येथील एका अंगणवाडीमधून डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेटचे वाटप करण्यात आले होते. दिलेला आहार काही लाभार्थ्यांनी घरी नेला होता. परंतु त्यातील एका व्यक्तीला आहाराचे पॅकेट उघडल्यानंतर चक्क सापाचे मृत पिल्लू सापडले.

नेमके काय घडले?

कृषिनगर अंगणवाडी क्रमांक ११६ येथून येथील लाभार्थी माझी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्या साठी आहार घरी नेला व तो पॅकींग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला. त्यांनी तत्काळ संबधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला. संबधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला व ही बाब निदर्शनास आणून दिली.

सदर प्रकरण लक्षात येताच अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ पातळीवर देखील याची माहिती देत, पोषण आहार वाटप कार्यक्रम थांबवला आहे. मात्र या पोषण आहारात मृत साप आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार २५ जूनला समोर आला होता. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ, मटकी, मूगडाळ यांना किडे आणि अळ्या लागल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा आता मृत साप सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -