Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ

Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या अमूल (Amul company) आणि पराग कंपनीने (Parag company) दुधाचे दर वाढवले होते. त्यानंतर आता गोकुळ (Gokul) कंपनीने देखील दुधाच्या दरात वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांची चिंता आणखी वाढली आहे.


एका बाजूला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Milk Farmers) दुधाला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला विविध दूध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करत आहेत. अमूल (Amul), मदर डेअरी (Mother dairy), परागनंतर आता गोकुळनेही गायीच्या दूध दरात (Gokul Milk Price hike) वाढ केली आहे. गोकुळने दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाची किंमत आता प्रतिलीटर ५४ रुपयांवरुन ५६ रुपयांवर गेली आहे. मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल ३ लाख लिटर विक्री होते. तर पुण्यात भागात ४० हजार लिटर दूधाची विक्री होते. त्यामुळे आता दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.



शेतकऱ्यांना दिलासा


सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपासून दूधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ३५ रुपयांना भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ३० रुपये स्थायी भाव तर ५ रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. १ जुलैपासून हे नवे दर लागू झाल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


दरम्यान, खुले दूधाचे बाजारभाव सध्या ९० रुपये प्रति लिटर आहे. तर गोकुळ दूध १ लिटर ७२ रुपयांना मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध ७६ रुपये तर अमूल दूध ६८ रुपयांना विकले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दूधाचे दर ४० रुपये व्हावे, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केलं होते. त्याच पार्श्वभूमीवर दूधाचे दर ३५ रुपये करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना लागणाऱ्या गोष्टींचेही भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे.

Comments
Add Comment