Tuesday, July 1, 2025

महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम २०१५च्या कायद्याची १५ दिवसात होणार अंमलबजावणी

महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम २०१५च्या कायद्याची १५ दिवसात होणार अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी लागू करण्यात आलेले महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम २०१५ची येत्या पंधरा दिवसात कार्यवाही केली जाईल कोल्हापूर जिल्ह्यातून या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल अशा पद्धतीचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिले.


महाराष्ट्र लोक हक्क अधिनियम २०१५ चा कायदा वापरला जात नाही तो जनतेसाठी उपयुक्त असून सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीची लक्षवेधी आमदार प्रकाश आबिटकर यांनी सभागृहात मांडली यावर आबिटकर यांच्यासह आमदार बच्चू कडू आणि इतर अनेक आमदार त्यांनी चर्चा केली . यावेळी आमदार भातखकर यांनी कोकण प्रांतासाठी आयुक्त नेमलेल्या नसल्याचे लक्षात आणून दिले मात्र शंभूराज देसाई यांनी या ठिकाणी अधिकारी नियुक्त केला असल्याची सांगितले.


तर आमदार बच्चू कडू यांनी जे अधिकारी कोणताही अर्ज सात दिवसाच्या आत मध्ये संबंधित अधिकाऱ्याकडे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवत नाही किंवा लाभार्थ्याला त्याचे उत्तर देत नाही अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली असा प्रश्न केला या संदर्भात शंभूराज देसाई यांनी त्यांना सभागृहात माहिती देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीसुद्धा आमदार कडू यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई किती केली असा प्रश्न विचारत आग्रह धरला. शेवटी शंभूराज देसाई यांनी या विषयावर सविस्तरपणे माहिती ठेवली जाईल असे सांगितले. ज्या अधिकाऱ्यांवर ३५० लाख रुपये पगारा पोटी खर्च करतो त्या अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने काम होत नसेल तर कारवाई काय करणार याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केला ज्यावर मंत्री देशांनी हा कायदा अमलात आणल्यानंतर अशा पद्धतीने कारवाई होईल ती पारदर्शकच असेल असे सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >