
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) आपल्या नावे केला. फायनल सामना २९ जून शनिवारी खेळवण्यात आला होता. यानंतर येथे चक्रवाती वादळामुळे संपूर्ण खेळ बिघडून गेला. त्यामुळे टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच थांबावे लागले.
वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद झाले आणि तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली. टीम इंडियाला मंगळवारी तेथून निघायचे होते मात्र याला उशीर झाला आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने टीम इंडियासाठी स्पेशल फ्लाईटची व्यवस्था केली होती. यासाठी त्यांना मंगळवारी निघायचे होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचायचे होते. दरम्यान, याला आता उशीर होत आहे.
जिंकला टी-२० वर्ल्डकप खिताब
भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली. याआधी २००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी १७ वर्षे वाट पाहावी लागली.