Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीश्रीरामपूर तालुक्यात गायरान जमिनीवरील दफनभूमीचा अतिक्रमणाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

श्रीरामपूर तालुक्यात गायरान जमिनीवरील दफनभूमीचा अतिक्रमणाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

पोलीस व तहसीलदारांच्या निलंबनाची शक्यता?

श्रीरामपूर : “लव्ह जिहाद पाठोपाठ लँड जिहाद” चा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात खीर्डी येथे उघड झाला असून याला दस्तुरखुद्द सहकार्य करण्याचे काम तेथील पोलीस अधिकारी व तहसीलदार करत असल्याचे गांवकरी सांगताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित सदर प्रकरण विधानसभेमध्ये गाजण्याची शक्यता आहे. पोलीस अधिकारी व तहसीलदार यांचे निलंबन होण्याची शक्यता दिसून येत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील शिर्डी येथील एका गायरान जमिनीत बुधवारी मध्यरात्री मुस्लिम समाजातील एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पुरण्यात आला. सदर बाब गावातील लोकांना समजल्यानंतर गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनाला कळताच पोलीस निरीक्षक थेट स्थळी पोहोचले. त्यांनी असे काहीच झाले नाही. बघतो, करतो आणि वेळ मारून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच सदर प्रकरण आमच्याकडे येत नाहीं. तुम्ही तहसीलदार यांना कळवा. असे सांगून येथून निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठले. सदर घडलेला प्रकार सांगितला. श्रीरामपूर येथील तहसीलदार मिलिंद वाघ यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तर देऊन ऑफिस मधून काढून दिले घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी सदर घटनेस भेट देऊन बैठक घेतली. गावातील शासनाची अंदाजे ३९ एकर गायरान जमिनीवर पाच एकराचे अतिक्रमण करून या पाच एकरात मुस्लीम समाजाने कंपाउंड मारून तेथे स्मशानभूमसी सुरू केली आहे. या गावातील मुस्लीम समाजाला स्मशानभूमीसाठी ४८ गुंठे अधिकृतपणे जागा दिलेली असताना सुद्धा त्यांनी पाच एकराचे अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमित जागेवर आत्तापर्यंत राजरोसपणे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अंदाजे ४१ मृतदेह दफन केले गेले. यातील फक्त सातच व्यक्ती गावातील आहेत. इतर ३४ मृतदहाचा खि्डीं या गावाशी कुठलाही संबंध नाही. असा धक्कादायक प्रकार समोर आला असताना पोलिस प्रशासन आणि तहसीलदार यांनी कोणताही तपास न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तहसीलदार महाशयांनी तर अतिक्रमीत जागेवर जाऊन पाहणी केली. नंतर ग्रामपंचायत मध्ये बैठक घेतली. कोणालाही विश्वासात न घेता ४० गुंठे जागा मुस्लिम लोकांनी दफन भुमिसाठी अजून द्यावी. असा निर्णय स्वतःच परस्पर घेऊन टाकला. पूर्वीची ४४ गुंठे जागा असताना आणि सदर गावात ५ मुस्लिम समाजातील घर असताना तहसीलदार असा अजब निर्णय देऊच तरी कसा शकतात? बाहेरील मृतदेह एवढे आले कुठून? अशी विचारणा गावकऱ्यांनी तहसीलदार यांना केल्यानंतर तहसीलदार बोलले की त्यामध्ये कोणीही अशी तक्रार करू शकत नाही. तो त्यांचा विषय आहे. असे अजब गजब उत्तर त्यांनी दिले आहे.

एकंदरीत सर्व विषयावरून असे समजते की, यामागे तहसीलदार यांचे काही आर्थिक लागेबंधे तर नाही ना? तहसीलदार यांची आर्थिक चौकशी व्हावी अशी समस्त गावकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली असून या संदर्भातील विषय लवकरच अधिवेशनात येणार आहे. त्यामुळे सदर विषय पावसाळी अधिवेशनात गाजणार असल्याचे सूत्रांच्या माहितीवरून कळते. तसेच या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी मृतदेह स्वतःच काढून हिंदू परंपरेने जाळणार असल्याचे देखील गावकऱ्यांनी व हिंदोळे संघटनांनी दिल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक प्रशासन आता काय नेमका काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -