Monday, October 20, 2025
Happy Diwali

कारभार सुधारा अन्यथा कारवाई करू - नितीन गडकरी

कारभार सुधारा अन्यथा कारवाई करू - नितीन गडकरी

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत पालघरचे खा.हेमंत सवरा यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे त्यांच्या दालनात भेट घेऊन पालघरवासीयांच्या हालअपेष्टा त्यांच्या कानावर घातल्या.यावेळी सवरा यांनी त्यांना मागण्याचे निवेदन दिले.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर रोड ते तलासरी,या पट्ट्यात महामार्गाचे काम गुणवत्ता पूर्वक झाले नसल्यामुळे त्या कामाची चौकशी करणे,वारंवार पडणारे खड्डे,सतत होणारी वाहतूक कोंडी,निकृष्ट दर्जाचे काम,सर्विस रोड इ. ज्वलंत संमस्यांकडे नितीन गडकरी यांचे त्यांनी लक्ष वेधले. गडकरी यांनी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संबंधितांवर कारवाई करा व कामाचा दर्जा सुधारण्याबाबत ठेकेदाराला कडक शब्दात सूचना करा,अन्यथा कारवाई करा,असे आदेश दिले.

दरम्यान, गडकरी यांच्या आदेशानंतर तरी हा ठेकेदार आपल्या कामात सुधारणा करतो का याकडे पालघर जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment