Saturday, July 5, 2025

आकाशवाणी आमदार निवासमधील लिफ्ट अचानक पडली बंद... लिफ्टमनला हृदयविकाराचा धक्का... तर त्यात आमदार असता तर त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली असती

आकाशवाणी आमदार निवासमधील लिफ्ट अचानक पडली बंद... लिफ्टमनला हृदयविकाराचा धक्का... तर त्यात आमदार असता तर त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली असती

बंद पडणाऱ्या लिफ्टचा विषय विधानसभेत चर्चेला


आमदार हरिष पिंपळेंनी थरार सांगितला, अध्यक्ष संतापले

आकाशवाणी आमदार निवास लिफ्टला निकृष्ट साहित्य पुरविले; चौकशी करून कारवाई करणार


मुंबई : आकाशवाणी आमदार निवास मधील बंद पडणा-या लिफ्टचा विषय आज विधानसभेत चर्चेला आला. आमदार हरीश पिंपळे यांनी हा विषय मांडताना आमदार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना घेऊन जाणारी लिफ्ट बंद पडली. त्यात आमदारांचे पीए अडकले. लिफ्ट अर्धा-पाऊण तास बंद पडल्याने लिफ्टमनला हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यामुळे त्यांना उपचार सुद्धा वेळेवर देता आले नाहीत. याच जागी आमदार असते तर त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली असती, असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.


त्यावर आकाशवाणी आमदार निवास ला लिफ्ट साठी साहित्य आणि देखभाल दुरुस्ती करणारी यंत्रणा योग्य काम करत नसेल तर त्यांचेवर कारवाई केली जाणार आणि लिफ्ट साठी पुरविले जाणारे साहित्य चागल्या दर्जाचे आहे की नाही याची चौकशी करून त्यात दोषी आढल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. तर मनोरा आमदार निवास वेळेत पूर्ण होईल असे सांगितले.

Comments
Add Comment