Monday, April 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAmbadas Danve : काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंची वरिष्ठांकडून कानउघडणी!

Ambadas Danve : काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंची वरिष्ठांकडून कानउघडणी!

अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session 2024) सुरू आहे. दोन दिवसापूर्वी विधान परिषदेत भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी दानवेंचा तोल सुटला आणि दानवे यांनी शिवीगाळ केल्याचे समोर आले. यानंतर दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतरही ‘आंदोलन करा किंवा कोर्टात जा, जिथे जिथे जायचे आहे तिथे जा, काय करायचे ते करा, भाजपाने आम्हाला नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही.’, अशी टोकाची भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली होती.

त्यानंतर अंबादास दानवे यांच्या चुकीबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृह, उपसभापती, सभागृहातील महिला सदस्यांची क्षमा मागितली. तसेच अंबादास दानवे यांची चांगलीच कानउघडणी केली.

त्यानंतर आता अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून शिवीगाळ प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु दि. १ जुलै रोजी माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम रहावे हीच आहे, त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता भगिणींचे प्रश्न सोडवण्यापासून मला थांबविणे असे होऊ नये, या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, ही विनंती, असेही पत्रात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -