
मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या चरबीने त्रस्त आहात तर काही देशी उपाय करून तुम्ही १५ दिवसांत फायदा मिळवू शकता.
आजकाल बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात फॅट जमा होते. यामुळे वजन वाढत जाते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
जर तुमचेही पोट चरबीमुळे बाहेर आले असेल आणि ते कमी करायचे असेल तर हा उपाय करून तुम्ही ते कमी करू शकता.
हिरड्याचे चूर्ण सेवन करून तुम्ही वाढलेले पोट कमी करू शकता. याची पावडर बनवा. पावडर नसल्यास ते वाटून तुम्ही चूर्ण बनवू शकता. अर्धा चमचा हिरडा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. सकाळी-सकाळी हे प्यायल्याने पोट कमी होईल.
हिरड्याच्या चूर्ण सेवनाने पोटाचे आरोग्य चांगले राखले जाते. यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते. अॅसिडिटीचीही समस्या दूर होते.