Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीतुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

तुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. येथे लोकांना रिचार्ज प्लानची वाढलेली किंमत पाहून नक्कीच धक्का बसू शकतो. यासोबतच एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसू शकतो. जिओने नव्या प्लानची यादी जाहीर केली आहे. यात स्पष्टपणे म्हटले आहे की जिओच्या काही प्रीपेड प्लानसोहत अनलिमिटेड ५जी फायदा होणार नाही.

रिलायन्स जिओ केवळ त्याच प्रीपेड प्लानवर अनलिमिटेड ५ जी डेटा देणार आहे जे दर दिवशी २ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा अधिक डेटा वापरतात. याचाच अर्थ दर दिवशी १.५ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा कमी डेटाच्या प्लानमध्ये ५ जी इंटरनेट डेटाची सुविधा मिळणार नाही.

२८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लान ज्यात ५ जी डेटा मिळतो

३४९ रूपयांचा प्लान – आधी याची किंमत २९९ रूपये होती आता यासाठी ३४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.

३९९ रूपयांचा प्लान – आधी या प्लानची किंमत ३४९ रूपये होती त्यासाठी आता ३९९ रूपये द्यावे लागतील. यात दर दिवसाला २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.

४४९ रूपयांचा प्लान – याआधी या प्लानची किंमत ३९९ रूपये होती आता त्यासाठी ४४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -