Thursday, August 14, 2025

Pune News : पुणेकरांवर पाणीबाणी! दुरुस्तीच्या कामांसाठी 'या' तारखेला पाणीपुरवठा बंद

Pune News : पुणेकरांवर पाणीबाणी! दुरुस्तीच्या कामांसाठी 'या' तारखेला पाणीपुरवठा बंद

पुणे : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून पावसाने (Maharashtra Rain) राज्यभरात चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे (Heat) अनेक शहरांना पाणीबाणीच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र आता ऐन पावसाळ्यातही अनेक जिल्ह्यांवर पाणीकपातीचे (Water Shortage) संकट सुरुच असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच महापालिकेकडून पावसाळी कामे हाती घेण्यात येतात. अशाच काही दुरुस्तीच्या कामांसाठी पुणेकरांना (Pune Water Shortage) आता पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. पुण्यात एक दिवसासाठी पाणी येणार नसल्याने पुणेकरांना पाण्याचा साठा करुन ठेवावा लागणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये तांत्रिक कामे करण्यात येणार असल्यामुळे येत्या गुरुवारी काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यासोबत शुक्रवारी देखील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवा असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.



या भागात होणार दुरुस्तीचे काम


पुण्यातील खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.) जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर व भामा आसखेड जॅक्वेल येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.



'या' भागात पाणीपुरवठा बंद


पुण्यातील पेठा, हडपसर, येरवडा, कोथरूड, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता शहराच्या बहुतांश सर्व भागातील पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसराच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी देखील या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >