Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीPankaja Munde : मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी...

Pankaja Munde : मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते!

अर्ज भरण्याआधी पंकजा मुंडे सिद्धीविनायकाच्या चरणी भावूक

मुंबई : लोकसभेत (Loksabha) पराभव पत्करावा लागलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने विधानपरिषदेत (Vidhanparishad) संधी दिली आहे. काल भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव पाहून त्यांचे कार्यकर्तेही आनंदी झाले. आज विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे (Siddhivinayak) दर्शन घेतले. त्याच्या चरणी भावूक होत आपलं हे यश माझ्यासाठी बलिदान दिलेल्या जीवांच्या चरणी अर्पण करते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. बीडमधील पाच तरुण कार्यकर्त्यांनी यामुळे आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन पंकजा मुंडे भावूक झाल्या होत्या व कार्यकर्त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते, असं त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात ज्यांनी मला संधी दिली त्या जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे मी आभार मानते. मला प्रतिक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी हे यश समर्पित करते, असं म्हणत त्या भावूक झाल्या.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?

भाजपकडून विधानपरिषदेसाठी काल पाच जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे व सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -