Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीMhada Lottery : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार साकार! २००० घरांची लवकरच...

Mhada Lottery : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार साकार! २००० घरांची लवकरच लॉटरी निघणार

जाणून घ्या ठिकाण, किंमत व इतर माहिती

मुंबई : मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र सातत्याने वाढत चाललेल्या घरांच्या किंमती पाहता सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडा (Mhada) किंवा सिडकोकडून (CIDCO) उपलब्ध होणाऱ्या घरांची वाट पाहात असतात. अशातच मुंबईत घर घेण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती मिळत आहे. म्हाडा लवकरच मुंबईत चक्क २ हजार घरांची लॉटरी (Mhada Lottery) काढणार आहे. खिशाला परवडणाऱ्या किंमतीत सर्वसामान्यांना ही घरे मिळणार आहेत. त्यामुळे अनेकांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून दरवर्षी घरांची लॉटरी काढली जाते. म्हाडाच्या इतर मंडळाच्या तुलनेत मुंबईमधील घरांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे पुढील महिन्यात म्हाडा २००० घरांची सोडत जारी करण्याच्या तयारीत असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाच्या घरांची सोडत जारी केली जाणार आहे. यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडाची ही घरे सर्व उत्पन्न गटासाठी असणार आहेत.

घरांची ठिकाणे व किंमत

  • कोपरी पवई येथे मध्यम गटासाठी ३३३ घरे असून याची किंमत १ कोटी २५ लाख रुपये असणार आहे. कोपरी पवई येथे उच्च गटासाठी ९३ घरे असून त्याची किंमत १ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये मध्यम गटासाठी ८६ घरांसाठी ७० ते ७२ लाख रुपये किंमत असणार आहे. कन्नमवारनगरमध्ये अल्प गटासाठी ८६ ते ८८ घरे असून त्याची किंमत ४०ते ५० लाख रुपये असणार आहे.
  • गोरेगाव पहाडीमध्ये मध्यम गटासाठी १०५ घरे असणार असून त्याची किंमत १ कोटी ७ लाख ५ हजार रुपये असणार आहे. उच्च गटासाठी २२७ घरे असणार असून त्याची किंमत १ कोटी २५ लाख ९१ हजार रुपये असणार आहे. तर गोरेगाव पीएमएवाय येथे अत्यल्प गटासाठी ८८ घरे असणार असून त्याची किंमत ३३ लाख २ हजार रुपये असणार आहे.
  • खडकपाडा भागामध्ये अल्प गटासाठी ८७ घरे असणार असून त्याची किंमत ६४ लाख १२ हजार ५८४ रुपये असणार आहे. खडकपाडा भागामध्ये उच्च गटासाठी ४६ घरे असणार असून त्याची किंमत ८६ लाख ११ हजार ९२३ रुपये असणार आहे.
  • मालाड शिवधान येथे अल्प गटासाठी ४५ घरे असणार असून त्याची किंमत ५४ लाख ९१ हजार रुपये असणार आहे. मालाड शिवधान येथे मध्यम गटासाठी २० घरे असणार असून त्याची किंमत ७२ लाख रुपये असणार आहे. मालाड शिवधान येथे उच्च गटासाठी २३ घरे असणार असून त्याची किंमत ७३ लाख २२ हजार रुपये असणार आहे. तर याच ठिकाणी मध्यम गटासाठी आणखी १ घर असणार असून त्याची किंमत ९० लाख ७४ हजार रुपये असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -