Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीGoogle Aai : तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवायला येतेय 'गुगल आई'!

Google Aai : तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवायला येतेय ‘गुगल आई’!

उत्सुकता वाढवणारा टीझर रिलीज; ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई : सध्याच्या काळात इंटरनेटचा (Internet) वापर सातत्याने वाढत चालला आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास प्रत्येक जण गुगलची (Google) मदत घेतो. अशातच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये (Marathi Cinema) वेगवेगळ्या विषयावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निर्माते कायम चित्रपटाच्या कथेत काहीतरी वेगळेपण दाखवण्याच्या तयारीत असतात. अशाच एका आगळ्यावेगळ्या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. ‘गुगल आई’ (Google Aai) या वेगळ्या कथेच्या चित्रपटाबाबत अनेकांना उत्सुक्ता लागली होती. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय आहे टीझर?

‘गुगल आई’ टीझरमध्ये एक चिमुकली आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दिसत आहे. मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते. आता नेमके काय घडले आहे आणि यातून ‘गुगल आई’ या कुटुंबाला कसे बाहेर काढते हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

कोणते कलाकार दिसणार?

‘गुगल आई’ हा एक कौटुंबिक आणि रहस्यमय चित्रपट आहे. यामध्ये प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती डॉलर्स दिवाकर रेड्डी यांनी केली आहे. तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा, पटकथा, लेखनाची धुरा सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शकांची उत्सुकता

२६ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ‘चित्रपटात एका लहान मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये संकटात अडकलेल्या आपल्या कुटुंबाला ‘गूगल आई’ कसे बाहेर काढते हे पाहायला मिळणार आहे. आता हे कुटुंब कोणत्या कारणासाठी, कसे संकटात सापडले आहे आणि त्यांची सुटका कशी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते किती उपयुक्त ठरेल, हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे’ असे दिग्दर्शक गोविंद वराह यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by GoogleAai (@googleaaifilm)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -