Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या घराभोवती ड्रोनच्या घिरट्या! मराठा आंदोलक धास्तावले

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या घराभोवती ड्रोनच्या घिरट्या! मराठा आंदोलक धास्तावले

जरांगेंसाठी सरकारकडून झेड प्लस सुरक्षेची मागणी

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला सगेसोयरे बाबत निर्णय घेण्यासाठी १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, त्यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे सध्या जालन्यात (Jalna) आंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या घरी राहत आहेत. या घराभोवती तसेच आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रोन (Drone) फिरताना दिसून आला आहे. काल रात्री स्वतः जरांगे यांनी घराच्या गच्चीवरुन ड्रोन फिरताना पाहिला. यामुळे मराठा आंदोलक (Maratha Protesters) धास्तावले आहेत. जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी जरांगे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) द्यावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंतरवालीच्या गावकऱ्यांनी या ड्रोनबाबत पोलिसांकडे तक्रार केली असली तरी मराठा आंदोलक हे काहीसे धास्तावले आहेत. सरकारने जरांगेंना झेड प्लस सुरक्षा द्यावी, या मागणीसाठी पांडुरंग तारख हे आज जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता सरकार मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देणार का, हे पाहावे लागेल.

अंतरवाली सराटीत मध्यरात्री नेमकं काय घडलं?

सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली. या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे. या प्रकरामुळे अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत अशाच प्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आला होता.

गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई काय म्हणाले?

राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घराबाहेर फिरणाऱ्या ड्रोनबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. या संदर्भात चौकशी करुन सविस्तर अहवाल दिला जाईल. जरांगे पाटील यांना याआधी हत्यारी संरक्षण दिले आहे. पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलून अधिक संरक्षण देण्याची गरज असल्यास ते दिले जाईल, असे आश्वासन शंभुराज देसाई यांनी सभागृहात दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -