Saturday, July 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAditya Thackeray : विधीमंडळात फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी लिफ्टमध्ये...

Aditya Thackeray : विधीमंडळात फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरे म्हणाले, ‘मी लिफ्टमध्ये…

फडणवीसांनाही हसू अनावर

मुंबई : विधीमंडळात काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची समोरासमोर भेट झाली होती. यावेळी या दोघांनीही एकाच लिफ्टमधून प्रवास केला होता व बातचीतही केली होती. आधीचे साथीदार व आता एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या या दोन नेत्यांच्या लिफ्ट प्रवासामुळे ते पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक मीम्स व रील्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांचा लिफ्ट प्रवास चांगलाच गाजला. यानंतर आज विधान भवन परिसरात उद्धव ठाकरेंचे पुत्र व उबाठा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची व फडणवीसांची समोरासमोर भेट झाली आणि एक किस्सा घडला. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

विधानभवनाच्या लॉबीत आज दुपारी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची ओझरती भेट झाली. यावेळी फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात हसतखेळत संवाद झाला. आदित्य ठाकरेंना पाहून फडणवीसांनी विचारले की, नमस्कार काय चाललंय? त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी लिफ्टमधून चाललोय. त्यांच्या या वाक्यावर देवेंद्र फडणवीस अगदी मनमोकळेपणाने खळाळून हसले. आदित्य ठाकरेही त्यावर जोरात हसले. यानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले.

निवडणुकीदरम्यान एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या या दोन नेत्यांमधील जवळीक ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -