Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीAmravati News : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

Amravati News : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

६ जण गंभीर जखमी

अमरावती : अमरावती (Amravati News) जिल्ह्यात बसला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटवरुन मध्यप्रदेशच्या दिशेने धावणाऱ्या बसचा दरीत कोसळल्यामुळे भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून ८ ते १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस अकोट तालुक्यातील पोपटखेडच्या रस्त्यावरुन जात होती. मात्र वळणा वळणाच्या रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खटकालीजवळील ‘हाय पॉईंट’ जवळ ही बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. प्रवाशांना दरीतून वर काढून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

जखमींची माहिती

बसमध्ये २५ ते ३० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अकोटवरून एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या. अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून ८ ते १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने बसमधील सर्व लहान मुले सुरक्षित आहेत.

स्थानिकांची मागणी

मेळघाटमधील सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉईंट जवळ खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन दरीत कोसळली. अकोल्यातील अकोट शहरातून अ‍ॅम्बुलन्स आणि एकलव्य बचाव पथकासह वनविभाग घटनास्थळी दाखल झाल्याने जखमींना बाहेर काढण्यास यश आले. मात्र या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्या, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -