Wednesday, July 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजVidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा!

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा!

पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी?

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) धामधूम सुरु झाली आहे. यासाठी राजकीय पक्षांनी (Political parties) उमेदवारांची घोषणा देखील करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडूनही मुंबई प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी दहा जणांची यादी केंद्राकडे पाठवली होती. त्यातून आता भाजपकडून विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे व त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

यंदा लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात पराभव पत्करावा लागलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे व सदाभाऊ खोत अशा एकूण पाच जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपकडून सावधरित्या पावलं उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे. मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे.

पंकजा मुंडे यांची उमेदवारी महत्त्वाची

पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर बीडमधील वंजारी समाज दुखावला गेला होता. चार जणांनी आत्महत्या देखील केली होती. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी त्यांच्या समर्थकांकडून मागणी केली जात होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पंकजा मुंडे यांना विधानसपरिषदेवर संधी देण्याचं भाजपने ठरवलं आहे. त्यामुळेच त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना देण्यात आलेली विधानपरिषेदची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -