
पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं...
कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. लोणावळ्यात भुशी डॅममध्ये (Lonavla Bhushi dam) एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेले तर आज ताह्मिणी घाटातही (Tamhini Ghat) स्टंटबाजीच्या नादात एक तरुण वाहून गेला. या घटना ताज्या असतानाच आता कोल्हापुरातून (Kolhapur) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील दूधगंगा नदीवर पावसाळी पर्यटनाकरता आलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळी पर्यटनासाठी निपाणीहून कोल्हापुरातील काळमवाडी येथे १३ जणांचा ग्रुप आला होता. यांपैकी २ तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. गणेश चंद्रकांत कदम आणि प्रतीक पाटील अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही निपाणी येथील रहिवासी होते.