Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीYavatmal Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चार जण ठार

Yavatmal Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चार जण ठार

इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात 

यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून आता यवतमाळमधूनही एक भयंकर अपघाताची घटना (Yavatmal Accident) समोर आली आहे. इनोव्हा कार ट्रकला धडकल्यामुळे कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील (Yavatmal Nagpur Highway) चापरडा गावाजवळ हा अपघात (Road Accident) झाला.

प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. हे सर्वजण पंजाबवरुन आले होते. ते नांदेड येथील गुरुद्वारामध्ये चालले होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली.

ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. इनोव्हा कारच्या बोनेटचा भाग जोरात धडक झाल्यामुळे ट्रकच्या मागच्या भागात शिरला. त्यामुळे बोनेटचा पत्रा उखडला गेला आणि पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. या गाडीत एअरबॅग्ज नव्हत्या. त्यामुळे चालकासह मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली. या जोरदार धडकेत इनोव्हा कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. या अपघाताचा तपास यवतमाळ पोलिसांकडून (Yavatmal Police) सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -