Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीTamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि...

Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला…

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार

पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत अशाच पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसोबत होत असलेल्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल लोणावळ्यातील भुशी डॅमच्या (Lonawala Bhushi Dam) मागच्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनाकरता आलेल्या एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच त्यातील एका मृतदेहाचा अद्याप शोधही लागलेला नसताना ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) आणखी एक तरुण वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. पर्यटनाकरता आलेल्या एका तरुणाने स्टंटबाजीच्या नादात आपला जीव गमावल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव असून एकूण ३२ जणांच्या आपल्या जिमच्या ग्रुपसोबत तो ताम्हिणी घाटात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आला होता. धबधब्यात पाण्याचा प्रवाह वेगाने असतानाही या तरुणांची मस्ती सुरु होती. त्यातच स्वप्नीलने धाडस म्हणून उंचावरुन पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्वतःला वाचवू शकला नाही. त्याने पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाह इतका जोरात होता की तो वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काहीच दिवसांपूर्वी रील्सच्या नादात तरुण आपला जीव धोक्यात टाकत असल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. ताम्हिणी घाटातही धाडस दाखवण्याच्या नादातच स्वप्नीलला आपला जीव गमवावा लागला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, रोहा-रायगड रेस्क्यू टीम, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. अद्याप त्याचा शोध घेतला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -